No title

1972 चा दुष्काळ आठवतोय,
माणशी अर्धा लिटर रॉकेल, ते ही डिझेल मिश्रित, त्याचासाठी सुद्धा सकाळ पासून रांगा, घरात जेवढी माणसे तेवढे सगळे वेगवेगळ्या दुकानापुढे उभे रहायचो !
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता, त्यामुळे देशात शांतता होती !
रेशन दुकानदाराकडून महिन्याचे सामान घेतले तरच रेशनची दोनशे ग्रॅम साखर, लाल गहू, मिलो, हे मिळणार अशी अवस्था होती.
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता, त्यामुळे देशात शांतता होती !
गॅससाठी नवीन नंबर लावायचा तर दोन तीन वर्षे वेटिंग असायचे, गॅस कनेक्शन साठी सुद्धा पाच पाच तास लाईन मध्ये उभे असायचो आपण,
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता, त्यामुळे देशात शांतता होती.
एवढंच काय, शासकीय दूध योजनेतील दुधाची बाटली घेऊन सकाळीच रांगेत उभे रहायचो, मग तिथली भांडणं, शिवाय त्यासाठीचे कार्ड काढायला ऑफिसमध्ये रांग लावायचो,
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता, त्यामुळे देशात शांतता होती.
सार्वजनिक नळावर रांग, सरकारी दवाखान्यात रांग, कास्ट सर्टिफिकेटसाठी रांग, std बूथ बाहेर रांग, कॉलेजला ऍडमिशन फॉर्म मिळवण्यासाठी रांग.... ही रांगेच्या आठवणींची रांग कितीही लांबू शकेल, पण हे सर्व होतं तेव्हा ही टीव्ही चॅनेल्स नव्हती, त्यामुळे देशात खरंच शांतता होती !

आजही, दूरदर्शन सोडून इतर चॅनेल्स एक दिवस बंद ठेवा,
तुम्हाला लक्षात येईल,
देशात खरंच शांतता आहे !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.